एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची. – Story in Marathi
एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची. – Story in Marathi
एका शहरात एक 👵 आजी 🍊संत्री विकायला बसायची.
एक दिवस तिच्या जवळ एक 👨तरूण आला साधारण ३० एक वयाचा..
त्याने 👵आजीला विचारले, “आजी 🍊संत्री कशी दिली ग?”
👵आजीने भाव सांगितला..
त्याने २ किलो 🍊संत्री विकत घेतली आणि त्यातल एक🍊 संत्र सोलुन एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला, “👵आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा?”
👵आजीने ✋हात पुढे करत 🍊संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली. आणी म्हणाली. “लेकरा गोडच हाय की”
तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला.
असच दुसरया दिवशीही तो आपल्या 👩पत्नीला बरोबर घेऊन आला.
त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात 🍊संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला.
असे बरेच दिवस निघून गेले.
👵आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे.
एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले, *तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन?*
तो 👨तरुण आपल्या 👩पत्नीला म्हणाला, अग वेडे 👵आजी रोज ही🍊 संत्री विकते पण ती स्वतः कधीच ही संत्री खात नाही, कारण तिला २ रूपये कमी मिळतील. मी तिला रोज एक संत्र खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो.
एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची. – Story in Marathi
पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.
दुसरया दिवशीही तसच घडल.
तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली, अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो ग तुला आजी? समदी संत्री गोड हायीत.
आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली. अग त्यो पिरमा पायी असा वागतुय. अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते.“
आजीचे शब्द एकुन त्याला खुप बर वाटल.
मनात विचार करत असताना.
शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरूणाला म्हणाली, *बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास. म्हणुन तर तुला न मागता संत्री आणि या आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या..*
मित्रांनो ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या…
पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका…
माणूसकी कमी होत चाललीय…
तेवढी फक्त जपायला शिका…
रोज जोक शेअर करता पण आज प्रत्येकाने ही पोष्ट शेअर करा… #📜इतिहास #💭माझे विचार
If you like these marathi story please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
कृपया, तुम्हाला मराठी स्टोरीसाठी ५ स्टार वोट नक्की करा