ganesh chaturthi wishes,गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes – गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा : श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा नक्की तुम्हाला आवडतील. धन्यवाद. Marathi-Suvichar.com🙏

प्रथम वंदन करूया,
गणपती बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोंड
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!


🌺👉Ganesh Chaturthi Wishes 👈🌺

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..


“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!


सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!


🌺👉गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा 👈🌺

वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


कृपया :- आम्हाला आशा आहे की तुम्हाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आवडल्या असतील…. एक विनंती गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका… धन्यवाद 🙏


कृपया, ५ स्टार वोट नक्की करा