Happy Birthday Wishes SMS Messages in marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Wishes SMS Messages in marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात
जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही
खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी….. !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.!
…तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा….. ..!
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
happy birthday wishes in marathi facebook
विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली.
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन,
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे
आपल्या मैत्रीचा पाया.
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत
उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी.
यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी.
वाढदिवसाच्या शुभकामना !
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहू नये म्हणून
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
वाढदिवसाच्या शुभेच्छा
द्यायला झाला वेट.
पण थोड्याच वेळात
त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी
निर्माण करणारा हा वाढदिवस
जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही
अशा या मनपसंद दिवशी
सुखांची स्वप्ने सफल होऊन अंतरंग
आनंदाने भरून जावे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Wishes SMS Messages in marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू नभी उंच उडावे तू
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू
वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.
नवे क्षितीज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो,
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो,
तुला कशाची कमतरता ना बसो,
आणि तुझं स्वस्थ्य असंच छान राहो
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना !