बोललेले शब्द परत येत नाहीत. | Motivational Stories in Marathi
बोललेले शब्द परत येत नाहीत. | Motivational Stories in Marathi
Motivational Stories in Marathi : आपल्या आयुष्यात बर्याच वेळा असे घडते की आपण दुसऱ्यावर विनाकारण रागवतो, चिड़चिड़पणा, रागाच्या भरात आपण दुसऱ्याला काहीतरी बोलतो असे आपल्या आयुष्यात घडते. आज मी तुमच्याबरोबर एक छोटी गोष्ट शेयर करत आहे जी मी You Can Win by Shiv Khera या पुस्तकामध्ये वाचली आहे. ती काळजीपूर्वक वाचा आणि त्यातून मिळणारा बोध लक्षात ठेवा.
बोललेले शब्द परत येत नाहीत
एकदा एका शेतकऱ्याने घरा शेजारी राहणाऱ्या माणसाला खूप शिवीगाळ आणि खूप वाईट बोलला. परंतु नंतर जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली, त्याला खूप वाईट वाटले आणि तो एका संताकडे गेला, त्याने संताला विचारले की त्याचे बोललेले शब्द परत कसे घ्यावेत.
[adace-ad id=”4135″]
संत त्या शेतकऱ्याला म्हणाले, “तुम्ही खूप सारे पंख गोळा करा आणि त्यांना शहराच्या मध्यभागी ठेवा.” शेतकऱ्यांने सांगेल तसे तेच केले आणि नंतर संता जवळ पोहचला.
मग संत म्हणाले, “आता जाऊन ते पंख एकत्र कर आणि त्यांना परत घेऊन या”
हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
शेतकरी परत गेला, पण तोपर्यंत सर्व पंख हवेतून उडून गेले होते. आणि शेतकरी रिकाम्या हाताने संतजवळ पोहोचला. मग संतांनी त्याला सांगितले की तुम्ही जे शब्द बोललात त्याबाबतीत पण असेच घडले. आपल्या तोंडातून शब्द सहजपणे निघून जातात परंतु ते शब्द परत घेऊ शकत नाही.
या कथेतून आपण काय शिकलो:
काही वाईट बोलण्यापूर्वी, लक्षात ठेवा की चांगले – वाईट बोलल्यानंतर काहीहि करुन आपले शब्द परत घेता येत नाहीत. परंतु आपण त्या व्यक्तीकडून क्षमा मागू शकतो आणि क्षमा मागायलाच पाहिजे. परंतु मानवी स्वभाव असा आहे की, काहीपण करा पण माणसाच्या मनाला कुठेतरी दुःख होत.
जेव्हा आपण एखाद्याला वाईट बोलतो तेव्हा त्याचा त्रास त्याला होतो. परंतु काही क्षणानंतर त्याला वाईट बोलल्याचे दुःख आपल्याला होते. त्यापेक्षा आपण गप्प राहणे चांगले. बरोबर ना मित्रांनो.
😊
आपल्या जवळ मराठी मध्ये काही लेख, प्रेरणादायक कथा किंवा मराठी मध्ये माहिती आमच्या बरोबर शेयर करायची असेल तर कृपया तुम्ही आपल्या फोटोसह ई-मेल करा. आमची ई-मेल id : gyanmarathi@gmail.com आहे. ती आम्ही येथे तुमच्या फोटोसह येथे प्रकाशित करू. धन्यवाद!