मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 Purushacha Baap Kadhi Hoto – पुरुषाचा “बाप कधी होतो?” नक्की वाचा, – Marathi Kavita
Marathi Kavita नवीन सुविचार सुंदर मराठी कविता सुंदर सुविचार

Purushacha Baap Kadhi Hoto – पुरुषाचा “बाप कधी होतो?” नक्की वाचा, – Marathi Kavita

Purushacha Baap Kadhi Hoto Marathi Kavita पुरुषाचा “बाप कधी होतो?” नक्की वाचा, – Marathi Kavita 🌺 सुंदर मराठी कविता 🌺 👈🌺

बायको “गोड बातमी” सांगते ते
ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

नर्सने ओंजळीत ठेवलेला काही
पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड
ओझ्याची जाणीव करून देतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

बायकोबरोबर जागवायच्या रात्री
डायपर बदलणे आणि पिल्लाला
कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात
व्यतीत होउ लागतात,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके
नीरस वाटून संध्याकाळी पावलांना
घराची ओढ लागते,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

Marathi Kavita 🌺 सुंदर मराठी कविता

“लाईन कोण लावणार” म्हणत
सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने
खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या
फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून
तासंतास इमानदारीत उभा रहतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

ज्याला उठवताना गजर हात टेकतात
तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा
पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ
नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

खऱ्या आयुष्यात एका झापडित
कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरो-
बरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या
नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

स्वतः कमीजास्त शिकला असला तरी
पोराला “नीट अभ्यास कर रे” असे
पोट तिडकिने सांगू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

आपल्याच कालच्या मेहनतीच्या
जोरावर आपला आज मजेत जगणारा
अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच
आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••

Marathi Kavita 🌺 सुंदर मराठी कविता

ऑफिसात अनेकांचा बॉस बनून
हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये
वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून,
कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स
आज्ञाधारकपणे ऐकत असतो.
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

आपल्या अप्रेझल आणि प्रमोशन-
पेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या
यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल
जास्त काळजी करू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा
पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत
तो गुंगुन जातो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

गाडीतून सतत फिरणारा तो
पोराच्या सायकलची सीट पकडून
सायकलच्या मागे धावू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या
चूका पोराने करू नयेत म्हणून
प्रिचिंग सुरु करतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी
पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता
“कॉन्टेक्ट्स” समोर हात जोडतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

“तुमचा काळ वेगळा होता, आता
जमाना बदलला, तुम्हाला काय कळ-
णार नाही. This is generation gap!”
असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद
आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या
बापाच्या आठवणीने हळवा होऊन मना-
तल्या मनात त्याची माफी मागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

पोर मोठी करताना आपण कधी
म्हातारे झालो हे लक्षात येत नाही
आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून,
कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धा-
श्रमाची पानगळ बनून अगदीच नशीब-
वान असला तर नातवंडांसमवेत चार
दिवस रमून•••••••कसेही असले तरी
भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत
कधीतरी सरणावर चढतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••!!


कृपया :- आम्हाला आशा आहे की सुंदर मराठी कविता Sundar Marathi Kavita तुम्हाला आवडल्या असतील. जर खरच आवडल्या असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…


कृपया, तुम्हाला सुंदर मराठी कविता आवडल्या तर ५ स्टार वोट नक्की करा

Tags: marathi kavita aai marathi kavita friendship marathi kavita marathi kavita marathi kavita on life marathi kavita on love marathi kavita on nature marathi kavita sangrah my marathi kavita कविता कविता कहानी कविता प्रेम कविता मराठी कविता वीडियो चारोळी छोटी कविता शायरी सुंदर कविताएं हिंदी कविता संग्रह हिन्दी कविता बच्चों के लिए
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.