
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार Heart touching love Quotes in marathi
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार heart touching love quotes in marathi
मराठी प्रेम सुविचार (1)
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
मराठी प्रेम सुविचार (2)
प्रेमाची व्याख्या करायला
ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही
मराठी प्रेम सुविचार (3)
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी
मराठी प्रेम सुविचार (4)
हळुहळू तुझ्यावर
विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या
जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी…
पण हळुहळू तुझ्या हृदयाची
काळजी करू लागलोय मी…
मराठी प्रेम सुविचार (5)
तुझ माझ अस न राहता
‘आपल’ म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत.
मराठी प्रेम सुविचार (6)
माझ्या आयुष्यातील प्रत्येक चाहूल तुझी झाली…….
गोड या स्वप्नांना या पापण्यात लपवायचे आहे,
तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे……!!!!
तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे………!!!!
मराठी प्रेम सुविचार (7)
“….ज्याला प्रेम समजतं,
शब्द समजतो तो वेळ पाळतो,
नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो
तो वेळ साधतो “
मराठी प्रेम सुविचार (8)
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
मराठी प्रेम सुविचार (9)
प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी
‘म’ म्हणजे मन माझ.
मराठी प्रेम सुविचार (10)
असेल कोणीतरी एखाद्या वळणावर
माझीही वाट पाहणारी
माझ्याचसाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझं एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझं दुःख आपलं मानणारी
मला समजून घेणारी
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
केवळ माझ्याचसाठी जगणारी
आणि माझ्याचसाठी मरणारी
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार Heart touching love Quotes in marathi
मराठी प्रेम सुविचार (11)
आयुष्य खुप कमी आहे, ते
आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..!
मराठी प्रेम सुविचार (12)
“जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर
माणसाने प्रेम करावं कारण
प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही“”
मराठी प्रेम सुविचार (13)
या जगात प्रेम तर सर्वच करतात…
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
मराठी प्रेम सुविचार (14)
“प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते.
जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त.
आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो.
म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.”
मराठी प्रेम सुविचार (15)
“हवेत ऑक्सिजन असतोच पण ..
माश्याला पाण्यातालाच ऑक्सिजन हवा असतो ….
आपल्या सर्वांचंअगदी तसचं आहे कारण
आपल्या आजूबाजूला चांगल्या व्क्यक्ती असतातच
पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते.”
मराठी प्रेम सुविचार (16)
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधि होणार नाही
मराठी प्रेम सुविचार (17)
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी……….
तूच एक असशील ना ?
मराठी प्रेम सुविचार (18)
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती
आपल्याला सोडुन जाताना
ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे
दरवाजे बंद करुन जातात.
मराठी प्रेम सुविचार (19)
आठवण हि एक अशी आहे,
ती जवळ ही ठेवता येत नाही आणि
समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.
मराठी प्रेम सुविचार (20)
आपल्याला जे आवडतात
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
प्रेमावरील हे सुविचार पण वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…