Navara Baykoch Nata – नवरा बायकोच नात
🌺👉 Navara Baykoch Nata – नवरा बायकोच नात म्हणजे – Nati Marathi Suvichar 🌺 नाती मराठी सुविचार👈🌺
नवरा बायकोच नात म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ,
ती ज्याच्याशी पडली तो कसाही तिला शोधत येतो,
डोळ्यातून प्रेम पाझरत अन दोन जीव एक होतात,
सुरुवातीला सगळं सुंदर असत,
तिलाही त्याची जास्तच काळजी असते,
सगळं काही हाती द्याव अस तिला वाटते,
मग तो ही तिला तसच जपतो,
पहिले पहिले येणारे सणवार साजरे करता करता वर्ष संपत,
प्रत्येकवेळी जगापुढे एकमेकांचं कौतुकच असत ,,,
तो माझं किती ऐकतो ती माझी किती काळजी घेते
मित्र मौत्रिणीत सांगणं सुरूच असत,,,
मग ते पहिलं बाळ,जपण्याची त्याचीही खूप धांदल,
नऊ महिने निघून जातात,
तीच खाणंपिणं तिचा दवाखाना,
धक्का लागू नये म्हणून प्रयत्न जे आवडेल ते खायला देणं,,,,,
आता तीच दुखणं सुरू झालं की
त्याचंही मन रडत बसत,
इतका त्रास प्रसूतीच्या वेदना
त्याच्या डोळ्यात पाणी आणून सोडतात,,,,
बाळ हळूहळू मोठं होत
त्याचंही कौतुक चालत,
नाक माझं तर डोळे तुझे 😊😊
संसार पुढे पुढे चालत रहातो,,,,,,,,,,,
आता त्याला ती सगळं हातात नाही देऊ शकत
म्हणून रागाचा रूप धारण होत”,
आता माझी काळजीच नाही तुला,
तुझं लक्षच नसत,,
मला काय पाहिजे काय नाही तुझ्या ध्यानातच नसत”
तिलाही वाटत मी स्वयंपाक करून घामाने ओली झाली
मला समजून घ्यावं पण
त्याला काही नाही त्याचा चहा मधेच येतो,,,
“मी काय आता सोळाची नाही माझंही शरीर थकत,
कधी विचारत नाही मला तुला काय लागत😢
“तो त्याच्या जाग्यावर खरा आणि ही पण,,,,,,,
मग काय वाद वाढतच जातात,
कधी कधी तो तीच माहेर काढतो मग ती थोडी मागे रहाणार अख्ख खानदान काढते,,
ओढ कमी होत जाते,,
तिला मुलाची काळजी जास्त अस त्याला वाटत
पण ती तर दोघांची ना मग हे भान का विसरत ,,,,,,
भांडण झाले की मुलांना मध्ये घेणं सुरू होत
त्यांनाही कळत यांना एकमेकांचं सगळं ऐकू येत
मग कशाला आपली भूमिका,,,,,,
चालू द्या यांच हे असंच असत थोडं थोडं झालं की भांडण असत
अन थोड्यावेळातच सगळं बदललेलं असत ,,,,,
एकमेकांची औषधी सांभाळून घ्यायला लावण्याचा हट्ट असतो,
तिच्या प्रेमात एक हक्क असतो त्याची तब्बेत चांगली रहावं
म्हणून सगळा आग्रह असतो ,,,,,,
पण नवरा बायकोच प्रेम सदैव तरुण असत ,,,,,
एकमेकाला जपणं असत ,,,,,
खूप छोटस आयुष्य आहे एकमेकांसाठी वेळ द्यावा आणि प्रत्येक क्षण जगून घ्यावा ,,,,
वयानुसार प्रेमाचा रंग बदलत जातो हेच खऱ्या प्रेमाच रूप असत ,,,,
ते वाढत जात इतकं भांडणातही तेच मुरलेल असत ,,,,,
बहुतेक नवरा बायकोच नात असच असत कधी हसत कधी रुसत ,,,,
कृपया :- आम्हाला आशा आहे की family Suvichar नाती मराठी सुविचार, family Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला नाती मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा