नाती मराठी सुविचार - Family Marathi Suvichar

नाती मराठी सुविचार – Family Marathi Suvichar

नाती मराठी सुविचार (1)
♥ मी तुझ्यासाठी सगळं काही सहन करेन
मी तुलाच सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी
तू फ़क्त हो म्हण…
जीवनाच सोन करेन मी
सगळं सुख मी तुला देईन
तुझीच पुजा आयुष्यभर करेन मी
तू फ़क्त हो म्हण…
या जगाला सुद्धा जिंकून दाखवेन मी
प्रेम काय असतं हे दाखवून देईन मी
तू फ़क्त हो म्हण…
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा तु फ़क्त हो म्हण…
🌹🌷🌺🌺🌷🌹

नाती मराठी सुविचार (2)
👏🙏👏
लिहतो आहे कविता फक्त तुझ्यासाठी ..
वेडा प्रेमी झालो फक्त तुझ्यासाठी ..
आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे..
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी..
प्रत्येक श्वास माझा आठवण काढेल तुझीचं..
हा श्वास ही निघेल कदाचीत फक्त तुझ्यासाठी ..
सर्वांपेक्षा मला तू खूपचं जास्त आवडतेस..
मी प्रेम ही शिकलो ते
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी…
🌾🍁🌾👏🏻

नाती मराठी सुविचार (3)
🍁
मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहित असतेस
मी तुझी वाट पाहतो कारण
तुझ्याशिवाय मी कोणीच नसतो.
👍🏻🌺

नाती मराठी सुविचार (4)
🌸🌿🌸
मनातल्या भावनांचा सागर तू
आणि भावसागराचा किनारा मी
सागराच्या लाटांची चंचलता तू
आणि चंचलतेला जोडणारा तरंग मी
🙏💐🙏

नाती मराठी सुविचार (5)
🌹🌹👉🏻👇🏽
फुलाच्या गाभ्यातला सुगंध तू
आणि सुगंधाचा श्वास मी
श्वासांची ताल तू
आणि तालांचे ऐक्य मी
✨🌺

✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

नाती मराठी सुविचार (6)
🐾🌿🐾🌿
🎭माझ्याकडे कारण नाही की,
तू मला का आवडतेस..
माझ्याकडे प्रुफ नाही की,
मी तुझ्यावर प्रेम करतो..
माझ्याकडे माप नाही की,
मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो..
माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की,
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे
हे ठाम सांगू शकतो..
🌾🍁🌾

नाती मराठी सुविचार (7)
🌹💐🌹
मी प्रेम केलं……………
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पंदनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,
मी फक्त प्रेम केलं ……………
प्रेम फक्त करायचं असतं निस्वार्थ मनाने……….
प्रेम फक्त द्यायचं असतं निरपेक्ष अंतकरणाने………
मी फक्त प्रेम केलं मनापासून…….मनावर…
🌺🙏🙏🌺

नाती मराठी सुविचार (8)
🙏🌹🌹🙏
श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसांवरती,
केसांतून गळणाऱ्या थेंबाथेंबाने फुलून दिसते तुझ्या गालावरची खळी,
शाळेतले दिवस माझे नि तुझे
तुला भिजून प्रथमत: पाहिले,
भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले,
श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवून आणले माझ्यासाठी,
तिथेच ठरविले मी,
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी
🙏🌹🌹🙏

नाती मराठी सुविचार (9)
🙏🌹🌹🙏
बरसली सर पावसाची…
अन बदलला आज ऋतू …
एकीकडे तहानलेला मी…
अन दुसरीकडे चिंब भिजलेली तू…..

नाती मराठी सुविचार (10)
🌹💐🌹
हृदयाच्या गतीचा आलाप तू
आणि आलापाचा सूर मी
सुरांच्या माळेतला हिरा तू
आणि हिऱ्याचा प्रकाश मी
✍🏻✍🏻


[pt_view id=”37ec4c671u”]


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…