श्रीकृष्णाची आरती – Shri Krishna Aarti Marathi
श्रीकृष्णाची आरती – Shri Krishna Aarti Marathi
श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते.
श्रीकृष्णाची आरती (Shri Krishna Chi Aarti Marathi lyrics)
॥ श्रीकृष्णाची आरती ॥
✍️
ओवाळूं आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।।
🍃
✍️
चरणकमल ज्याचें अति सुकुमार ।
ध्वजवज्रांकुश ब्रीदाचा तोडर ।। १ ।।
🍃
✍️
नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान ।
हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। २ ।।
🍃
✍️
मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी ।
वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।।
🍃
✍️
जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान ।
तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ।। ४ ।।
🍃
✍️
एका जनार्दनीं देखियेलें रूप ।
पाहतां अवघें झाले तद्रूप ।। ५ ।।
– संत एकनाथ
🍃
॥ श्रीकृष्णाची आरती 2॥
✍️
हरि चला मंदिरा ऎशा म्हणती गोपिका म्हणती राधिका ।
भावें ओवाळिती यदुकुलतिलका ॥ धृ. ॥
🍃
✍️
एकीकडे राई, एकीकडे रखुमाई,
भावें ओंवाळिता हरिसी तूं होसी दो ठायीं ॥ हरि. ॥ १ ॥
🍃
✍️
अष्टाधिक सोळा सहस्त्र ज्याच्या सुंदरा, ज्याच्या सुंदरा ।
जिणें जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा ॥ हरि. ॥ २ ॥
🍃
✍️
एका जनार्दनी हरि तूं लाघवी होसी ।
इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी ॥ हरि. ॥ ३ ॥
🍃
हे पण वाचा :
श्री हनुमान चालीसा
संपूर्ण मराठी आरती संग्रह
शुभं करोति कल्याणम आरोग्यं
40+ धूम्रपानविरोधी घोषवाक्य मराठी
30+ मुलगी वाचवा मराठी घोषवाक्य
30+ रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य
मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
Tags : shri krishna aarti marathi lyrics, shri krishna aarti lyrics, aarti yadupati krishnachi lyrics, shri krishna aarti marathi pdf, aarti yadupati krishnachi sawariya nanda nandana, श्रीकृष्णाची आरती मराठी lyrics, krishna aarti lyrics in english