एक कागदाचं Marathi Kavita
🌺👉 एक कागदाचं – Marathi Kavita 🌺 सुंदर मराठी कविता 🌺 👈🌺
एक कागदाचं पान असतं…!!
‘श्री’ लिहलं, की
पूजलं जातं …प्रेमाचे चार शब्द
लिहले, की
जपलं जातं…काही चुकीचं
आढळलं, की
फाडलं जातं…एक कागदाचं
पान असतं…!!कधी त्याला
विमान बनवून
भिरकावलं जातं…कधी होडी बनवून
पाण्यात सोडलं जातं…कधी भिरभिरं बनवून
वाऱ्यावर फिरवलं जातं…आणि कधी तर
निरुपयोगी म्हणून
चुरगाळलंही जातं…एक कागदाचं
पान असतं….!!जे लेखकाच्या
लेखणीला हात देतं…जे चित्रकाराच्या
चित्राला साथ देतं…जे व्यापाऱ्याच्या
हिशोबाला ज्ञात ठेवतं…आणि हो,
वकीलासोबत कोर्टात गेलं,
की साक्षही देतं…एक कागदाचं
पान असतं…..!!पेपरवेट ठेवला, की
एकदम गप्प बसतं…काढून घेतला, की
स्वच्छंदी फिरतं आणि
कशांत अडकलं, तर
फडफडायला लागतं…एक कागदाचं
पान असतं…..!!ज्यावर बातम्या छापल्या,
की वर्तमानपत्र बनतं…प्रश्न छापले, की
प्रश्नपत्रिका बनतं…विवाहाचं निमंत्रण छापलं,
की लग्नपत्रिका बनतं…तर कधी आदेश~संदेश
लिहले, की तेच टपालही
बनतं…एक कागदाचं
पान असतं….!!एक कागदाचं
पान असतं…माणसाच्या जीवनांत
त्याच खूप
महत्व असत🍃🍂😊🌹
कृपया :- आम्हाला आशा आहे की सुंदर मराठी कविता, Sundar Marathi Kavita तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Trust Suvichar in Marathi
कृपया, तुम्हाला सुंदर मराठी कविता आवडल्या तर ५ स्टार वोट नक्की करा