Sajvat Hote Marathi Kavit 🌺 सुंदर मराठी कविता
🌺👉 Sajvat Hote Marathi Kavit 🌺 सुंदर मराठी कविता 🌺 Marathi Kavita 👈🌺
“मृत्यू “वर छान कविता…..
सजवत होते मला
मी शांत निजलो होतो,
बहुतेक आसवांच्या धारेनं
मी चिंब भिजलो होतो….शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची…..
ज्याला त्याला घाई
मला डोळे भरून पाहण्याची..ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं होत बालपण…..
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण……..जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं……
‘न्हेऊ नका’ मोठ्यानं
म्हणत होतं सारखं………..आज वेगळंच
काहीतरी घडत होतं……
वैऱ्याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं……….‘तिथपर्यंत’ नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते…..
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते……..अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल……
माझ्याच कुणीतरी विचारलं
‘अजून किती वेळ लागेल’…..सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं…..
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच
मला जाळंल होतं……….!
कृपया :- आम्हाला आशा आहे की सुंदर मराठी कविता, Sundar Marathi Kavita तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Trust Suvichar in Marathi
कृपया, तुम्हाला सुंदर मराठी कविता आवडल्या तर ५ स्टार वोट नक्की करा