Shravan mas suvichar in Marathi – श्रावण मास मराठी सुविचार
shravan mas suvichar
Shravan mas suvichar in Marathi – श्रावण मास मराठी सुविचार
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो. श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू धर्मात परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
Shravan marathi suvichar – श्रावण मास मराठी सुविचार
📌 Status (1)
✍️
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
🍃
📌 Status (2)
✍️
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
🍃
[adace-ad id=”4135″]
📌 Status (3)
✍️
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
🍃
हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
📌 Status (4)
✍️
वसंऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाते मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
🍃
📌 Status (5)
✍️
यक्षप्रश्न मनी झाला
का बरे निसर्ग गाऊ लागला
संगती झाडे वेली
अरे खुल्या मना रे
हा बघ श्रावण आला
🍃
📌 Status (6)
✍️
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
🍃
shravan mahina suvichar
📌 Status (7)
✍️
कोवळ्या उन्हासोबत
आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
तुषार किरणांनी साकारलेला इंद्रधनु
एका अलवार नात्याची
सप्तरंगी प्रतिमाच जणू
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
✒️
📌 Status (8)
✍️
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने प्यावा
वर्षाऋतू तरी
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
🍃