Aai Marathi Suvichar | आई मराठी सुविचार

Mother Suvichar on Marathi – आई मराठी सुविचार

जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुंदर अशा सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात.

जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी येथे सर्वात लोकप्रिय सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार – Marathi Suvichar संग्रह घेउन आलो आहोत…

आई मराठी सुविचार (1)
आई’ साठी आई….
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असत जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!

आई मराठी सुविचार (2)
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल

आई मराठी सुविचार (3)
आई म्हणजे
देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे
साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे
मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली, आई म्हणजे
दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी, जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून, चालायला शिकवणारी..
आईचं आपले, अस्तित्व घडवणारी..

आई मराठी सुविचार (4)
आई……
लेकराची माय असते, वासराची गाय असते,
दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते , आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!

आई मराठी सुविचार (5)
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।

Mother Suvichar on Marathi – आई मराठी सुविचार – Aai Marathi Suvichar

आई मराठी सुविचार (6)
घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात…!

आई मराठी सुविचार (7)
जगातील प्रत्येक घर हे शाळा आहे,
आणि माता पिता हे शिक्षक !

आई मराठी सुविचार (8)
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण
म्हणते मला भुख नाही ती म्हणजे
” आई”

आई मराठी सुविचार (9)
दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त …..आई….

आई मराठी सुविचार (10)
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!


[pt_view id=”9742d081r8″]


If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇