पहाटेच जाग आली नक्की वाचा – स्वतःहुन पुढे पाठवाल – मराठी सुविचार
पहाटेच जाग आली नक्की वाचा – स्वतःहुन पुढे पाठवाल – मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
😊💖🌟🌷
पहाटेच जाग आली
कोणी टकटक करीत होते,
दार उघडून पाहिले बाहेर
तर कुणीच उभे नव्हते…
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
💖
आवाजाच्या दिशेने बघताच
खिडकीवर दिसला एक पक्षी,
चोचीने टकटक करीत तावदानावर
उमटवीत होता नक्षी…
✒️
[adace-ad id=”4135″]
🍁
“का रे बाबा?” विचारले तर म्हणाला,
“भाड्याने मिळेल का एखादे झाड
घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो
पण जागा हवी पिल्लांसाठी…
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
🌸
तुमच्या भाऊबंदांनी लुटले
आमचे रान केले निर्वासित,
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी
असतो आता फिरस्तित…
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
🌹👇🏽
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत
थोडे दाणे अन पाणी,
पण निवाऱ्याचे काय?
हे लक्षात घेतच नाही कुणी…
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
🌿
पोटाला हवेच, खातो ती भिक
अन नेतो थोडे घरी,
खायला तर हवच,
जरी डोक्यावर छप्पर नसले तरी…
✒️
🌿
कधीकधी वाटते करावी आत्महत्या
बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून
त्या उंच मोबाईल टाॅवरवर…
✒️
🌿
जसे मग आत्महत्ये नंतर
सरकार काही देते शेतक-याला,
तसेच मिळेल का एखादं झाड
माझ्या पिल्लांना तरी आस-याला”
✒️
🌿
ऐकून मी चक्रावलो, खरचं
एवढा विचार मी नव्हता केला,
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा
विचार कुठेच नाही झाला…
✒️
🌿
मी हात जोडून म्हटले,
“त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,
पण आत्महत्या करू नको
खरचं मनापासुन सांगतो…
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
🌿
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर
बांध वनरुम किचन खोपा,
अडचण होईल पण आत्ता तरी
एवढाच उपाय आहे सोपा…”
✒️
🌿
तो म्हणाला, “खुप उपकार होतील,
पण भाडे कसे देणार?”,
“रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,
बाकी काही नाही मागणार…”
✒️
🌿
तो म्हणाला, “मला तुम्ही भेटलात
पण बाकी नातलगांच काय?,
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी,
कुठे ठेवतील पाय…?”
✒️
🌿
“अरे लावताहेत आता झाडे
अन जगवतात आता कुणी कुणी,
बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग
आत्महत्या करू नका कुणी…”
✒️
🌿
ऐकुन तो पक्षी उडाला
काड्या जमवायला घरट्यासाठी,
अन मी पण मोबाइल उचलला
तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी…
✒️
🌿
त्याची खिडकीवरची टकटक
माझ्या मनाचे उघडले कवाड,
वाचुन तुम्ही पण लावाल ना
कुंडीत वा अंगणात एकतरी झाड…
निदान एक तरी झाड !
🌳🌳 🌳🌳🌳
(मराठी सुंदर विचार लिहणाऱ्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🏻)
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(पहाटेच जाग आली नक्की वाचा) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,