मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 व. पु. काळे यांचे २५ सुंदर विचार
Marathi Quotes नवीन सुविचार मराठी कोट्स

व. पु. काळे यांचे २५ सुंदर विचार

व. पु. काळे यांचे २५ सुंदर विचार – Va Pu Quotes in Marathi

व. पु. काळे सुविचार (1)
🌹🌷गगनभरारीचं वेड🌹🌷
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही
पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं.
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
🌹🌷🌺🌺🌷🌹

व. पु. काळे सुविचार (2)
👏🙏झुंज🙏👏
वादळे जेव्हा येतात तेव्हा
आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं.
ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात.
वादळ महत्त्वाचे नसते.
प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि
त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
🌾🍁🍁🌾👏🏻👏🏻👏🏻👏🏻

व. पु. काळे सुविचार (3)
🍁🍂कॅलेंडर🍁🍂🍁
भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या
रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.
व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,
तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.
प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र, वेगळा विचार, वेगळी प्रगती, वेगळं शिखर.
👍🏻🌺 🌺👌🏻

व. पु. काळे सुविचार (4)
🌸🌿🌸🌿संघर्ष कुठपर्यंत?🎋🌸🌿🌸
आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात
तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो.
त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो.
असंच माणसाचं आहे…
समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.
पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि
आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
🙏💐💐🙏

व. पु. काळे सुविचार (5)
🌹✨🌿✨पडावं तर असं!🌿🌹🌹👉🏻👇🏽
आपत्ती पण अशी यावी कि
इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा.
पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये.
चांगलं २००० फुटांवरून पडावं.
म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.
✨✨✨✨✨✨🌺🌺

प्रेमावरील हे सुविचार पण वाचा

प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह

व. पु. काळे सुविचार (6)
🐾🌿🐾🌿परिपूर्णता?🌿🐾🌿🐾
🎭जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही.
परमेश्वरानं सोनं निर्माण केलं.
चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली.
मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ?
अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
🌾🍁🍁🌾

व. पु. काळे सुविचार (7)
🌹🌹💐नको असलेला भाग💐🌹🌹
दगडात मूर्ती असतेच.
त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो.
आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा.
झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस.
माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.
🌺🙏🙏🌺

व. पु. काळे यांचे २५ सुंदर विचार – Va Pu Quotes in Marathi

व. पु. काळे सुविचार (8)
🙏🌹पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ🌹🙏
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत
कारण ते INSTINCT वर जगतात…
बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा
एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
🙏🌹🌹🙏

व. पु. काळे सुविचार (9)
🙏🌹समस्या🌹🙏
अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात.
थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा.
दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना,
कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी
त्या वेगाने वर काठापर्यंत येते.
चिमटा शोधायला वेळ नसतो.
अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं.
मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.

व. पु. काळे सुविचार (10)
🌹💐प्रोब्लेम्स कुणाला नसतात?💐🌹
प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात.
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणसे.
या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.
✍🏻✍🏻

हे पण वाचा

सचिन तेंडुलकर यांचे सुरुवातीचे जीवन

व. पु. काळे सुविचार (11)
🌾🍁समोरच्याच्या दुःखाचे समाधान🍁🌾
समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल,
त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल
तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये.
कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला
पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो.
तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं.
तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.

व. पु. काळे सुविचार (12)
🌾🍁आयुष्याचे ‘सुयोग्य व्यवस्थापन’🍁🌾
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा.
जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा.
यालाच आयुष्याचे ‘सुयोग्य व्यवस्थापन’ असे म्हणतात.

व. पु. काळे सुविचार (13)
🌾🍁पळू नका🍁🌾
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही.
कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच.
पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत.
मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.

व. पु. काळे सुविचार (14)
🌾🍁पाठीची खाज🍁🌾
पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी ,
आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही
अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..

व. पु. काळे सुविचार (15)
🌾🍁माफी🍁🌾
माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर,
हे कधीही सिद्ध होत नाही.
माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी
त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.

व. पु. काळे सुविचार (16)
🌾🍁खर्च-हिशोब🍁🌾
खर्च झाल्याचं दुःख नसतं.
हिशोब लागला नाही कि त्रास होतो.

हे पण वाचा

राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन

व. पु. काळे सुविचार (17)
🌾🍁गैरसमज🍁🌾
गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो.
तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर
तो आपलं स्वरूप प्रकार करतो.

व. पु. काळे सुविचार (18)
🌾🍁शस्त्रक्रिया. भीती-अभिमान🍁🌾
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो.
बरा झाल्यावर शिवलेली जखम
तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

व. पु. काळे सुविचार (19)
🌾🍁अपेक्षा-ऐपत🍁🌾
घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा
देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.

व. पु. काळे सुविचार (20)
🌾🍁अपयशाची भीती🍁🌾
माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर?
याची त्याला भीती वाटते.

व. पु. काळे सुविचार (21)
🌾🍁खरी शोकांकिका🍁🌾
बोलायला कोणीच नसणं यापेक्षा
आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं
हि शोकांकिका जास्त भयाण.

व. पु. काळे सुविचार (22)
🌾🍁कौतुकाची खुमारी🍁🌾
कौतुकाला थोडी हेव्याची
किनार असल्याशिवाय
त्याला खरी खुमारी येत नाही.

व. पु. काळे सुविचार (23)
🌾🍁झरा आणि डबकं🍁🌾
वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं!
डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस!

व. पु. काळे सुविचार (24)
🌾🍁कागद-सर्टिफिकेट🍁🌾
सगळे कागद सारखेच!
त्याला अहंकार चिकटला कि
त्याचं सर्टिफिकेट होतं.

व. पु. काळे सुविचार (25)
🌾🍁रातकिड्याचा आवाज🍁🌾
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही.
त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास
तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो.

व. पु. काळे सुविचार (26)
🌾🍁फुगा किती फुगवायचा?🍁🌾
एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो.
तो फुटल्यावर समजतं,
तो किती फुगवायला नको होता.

व. पु. काळे सुविचार (27)
🌾🍁हरवण्यासारखं घडवा🍁🌾
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं ,
कारण अशा स्थळावरून परतताना
माणूस ‘माणूस’ राहत नाही.
परतून येतं ते चैतन्य!


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…

Tags: good thought of vp kale maitri va pu kale Marathi Quotes Marathi Suvichar v p kale books v p kale books pdf v p kale kathakathan v p kale poem v p kale stories V P KALE SUVICHAR v p kale thoughts v. p. kale quotes va pu 85 va pu kale birthday va pu kale kathakathan collection vol 2 va pu kale kavita sangrah va pu kale quotes on rain va pu quotes in marathi vapu vichar vapurza meaning
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.