Marathi Shayari on Dosti Love Life funny Video – मराठी शायरी
Marathi Shayari on Dosti Love Life funny Video – मराठी शायरी
होता असा एक काळ सारे
नम्र होते मजपुढे झेलण्यास
शब्द माझा होते उभे माघेपुढे
आता कुठे तो काळ,
त्याची खून हि नं राहिली आसवे
माझी स्वतःच्या काबूत नाही राहिली.
हसण्याची ईच्छा नसली तरी हसावे लागते.
कसे आहे विचारले तर
मजेत म्हणावे लागते ,
जीवन एक रंग मंच आहे .
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.
सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं….
विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !
पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !
आठवण आली नाही असं कधी झालच नाही !
आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..
…हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं ..
Marathi Shayari on Dosti Love Life funny Video – मराठी शायरी
मोगरा कितीही दूर असला तरी
सुगंध आल्याशिवाय राहात नाही ,
तसेच आपली माणस कितीही दूर
असली तरी आठवण आल्याशिवाय राहात नाही !
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली…
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली…
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;
माझ्या आयुष्याची सुरुवातही तुच आणि माझा शेवटही तुच…
जो बोलेल प्रेमाचा शब्दनशब्द तो आवाजही तुच…
जिच्यावर केल होत कधी मनापासुन प्रेम मी…
आजही माझ्या स्वप्नातली ती परीही तुच..
मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग
तरीही आपण गप्प का आहोत ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,
आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून
दाखवायलाही !
भेटीसाठी व्याकुळ झालेले मन आज त्रुप्त होणार ,
तुझ्या माझ्या भेटीला आज मुहुर्त सापडणार ,
वाटते जराशी भिती तरी माझ्या समोर तु असणार ,
आज सगळ्या जगाला विसरुन फक्त तुलाच पाहणार.
प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी
खुबसुरत नसली तरी, चारचौघीत उठून दिसणारी असावी
शेर -ए-गझल नसली तरी, माझी एक छानशी चारोळी असावी
प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा
तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा
ते दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा
तुम्ही शांत असता तेव्हा
ते हळूच येते आणि तुम्हाला स्पर्श करते,
तुमचे होउन जाते
म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची…
प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात..
कधी कधी..
आयुष्याची खेळणी बनुन जाते..
ज्याला/जिला ह्रदयात ठेवण्याचा प्रयत्न..
करतो आपण..
ते चेहरे फक्त आठवण बनुन राहतात..
प्रेम कस असत ते मला बघायचंय
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय..
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…
Marathi Shayari on Dosti Love Life funny Video – मराठी शायरी
प्रेम करतो तुझ्यावर…
सोडून मला जाऊ नकोस…
खुप स्वप्न बघितलित…..
तोडून कधी जाऊ नकोस….
प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.
पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन ,
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू,
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.
पाऊलहि दारी तुझ्या जाणून मी नाही दिले
जपलो तुझ्या नावास नाही
बदनाम तुझं होऊ दिले
स्वप्नातही माझ्या झारी का येतोस तू
आधी मधी स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी.
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओळी असावी लागते
तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात….!
तुझ्या हसन्याची व भोऱ्या केसांची
आठवण मला आहे
शक्यता तुला विसरण्याची
माझ्या मरणात आहे.
तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला…. .
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे .
तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून…..?
तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ,
बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे माझे विरह प्रेम..!
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर रुसायला बर वाटत ………
ऐकणारे कुणीतरी असेल तर मनातल बोलायला बरे वाटते …..
कौतुक करणारे कुणीतरी असेल तर थकेपर्यंत राबायला बर वाटत …….
आशेला लावणार कुणीतरी असेल तर वाट बघायला बर वाटत ………..
आपल्यासाठी मरणार कुणीतरी असेल तर
मरेपर्यंत जगायला बर वाटत ………..!
जेव्हा तिचा मुखचंद्र आम्ही
जवळून आगदी पाहिला दुर्बिणी घेऊन वाटे,
चंद्र जैसा पाहिला चंद्रापरी ते डाग जेव्हा,
गालावरी दिसले मला सादृश्याही उपमेतले त्या,
तेव्हा कुठे पटला मला
Marathi Shayari on Dosti Love Life funny Video – मराठी शायरी
जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा
जाताना एकदा तरी नजर
वळवून जा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून
जा
जख्म आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.,
गवत झुलते वा-याच्या झोतावर .
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .
माणूस जगतो आशेच्या किरणावर .
आणि मैत्री टिकते ती फक्त
“विश्वासावर”.
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.
काही मिळवलं होतं, काही गमावलं होतं.
फक्त ह्याच विचाराने, मन खुप रडलं होतं…..
पण ??
आज ह्याच विचाराने, मी शांत आहे कि
जे गमावलं होतं, खरचं ते मी कधी…..
मिळवलं होतं का ???
काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही।
घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही।।
कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची
जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू
जेव्हा …
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते
Marathi Shayari on Dosti Love Life funny Video – मराठी शायरी
ऐकिले दुसर्या कोणाच्या स्वप्नात ती आहे
तिथे बोलावलं नव्हते तरीही धाऊनी गेलो तिथे
आता तरी दुर्देव वाटे नक्कीच माझे संपले
पोहोचण्याआधीच तेही स्वप्न सारे संपले .
एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे…
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे…
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय …
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,
राहता आल पाहिजेल ..!
एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल…..
आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल…..
निरोप तुझा घेताना, मी मनसोक्त रडेल…..
पण ?????
तु माझी आंसव, पुसू नकोस…..
कदाचित फिरुन एकवार, सारं काही आठवेल…..
अन्, तुटलेलं ह्रदय पुन्हा, तुझ्या प्रेमात पडेल…..!!!
एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल…..
आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल…..
निरोप तुझा घेताना, मी मनसोक्त रडेल…..
पण ?????
तु माझी आंसव, पुसू नकोस…..
कदाचित फिरुन एकवार, सारं काही आठवेल…..
अन्, तुटलेलं ह्रदय पुन्हा, तुझ्या प्रेमात पडेल…..!!!
आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्……
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…….
पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात……..,
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं……
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…