अकबर बिरबल मराठी स्टोरी – Akbar Birbal Marathi Katha
साखर आणि माती अकबर बिरबल मराठी स्टोरी – Akbar Birbal Marathi Katha
एक दिवस, बादशहा अकबर यांच्या दरबार भरलेला होता, तेव्हा एक दरबारी हातात काचेची बरणी घेऊन आला.
बादशहाने विचारले – ‘या बरणीत काय आहे?’
दरबारी बोलला ‘यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे.’
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
“गड आला पण सिंह गेला” – तानाजी मालुसरे यांचा इतिहास
‘ते कशासाठी?’ अकबर बादशहाने पुन्हा विचारले.
‘माफी असावी, महाराज’ दरबारी बोलला. ‘आम्ही बिरबलच्या बुध्दिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छितो, आमची अशी इच्छा आहे की त्यांनी मातीतून साखरेचा दाणान दाणा वेगळा करावा.’
बादशहाने बिरबलकडे बघितले आणि स्मितहास्य करीत बोलले ‘हे बघ, बिरबल तुझ्यासमोर रोज नवीन आव्हान असतात, आम्हाला असे वाटते की तू पाणी न वापरता मातीतून साखर वेगळी करावी.’
‘हे तर खूपच सोपे आहे, महाराज.’ बिरबल बोलला. ‘हे तर लहान मुलांच्या खेळासारखे आहे’, असे म्हणत बिरबलने बरणी उचलली व तो दरबाराच्या बाहेर निघाला आणि दरबारी देखील त्याच्या मागे गेले. बिरबल बागेत गेला व तिथे त्याने एका आंब्याच्या झाडाच्या सभोवताली बरणीतील साखर व मातीचे मिश्रण पसरविले.
एका दरबाऱ्याने विचारले ‘हे तुम्ही काय केले?’.
‘याचे उत्तर तुम्हाला उदया मिळेल.’ बिरबल बोलला.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
भारताच्या स्वातंत्र्य साठी लढणारे महात्मा गांधी यांचे जीवन
दुसऱ्या दिवशी ते सर्वजण बागेतील त्या आंब्याच्या झाडाजवळ पोचले, तिथे फक्त माती पडलेली होती. साखरेचे सर्व दाणे मुंग्या गोळा करून आपापल्या वारूळात गेल्या होत्या, काही मुंग्या अजूनही साखरेचे दाणे घेऊन जाताना दिसत होत्या.
‘परंतु सगळी साखर कुठे बरे गेली?’ दरबाऱ्याने विचारले.
‘मातीपासून वेगळी झाली.’ बिरबल बोलला.
सर्व हसायला लागले.
बादशहाने सर्व दरबाऱ्यांना सांगितले, ‘जर तुम्हाला साखर पाहिजे असेल, तर मुंग्यांच्या वारूळात जाऊन बघा.’ सर्वजण जोरात हसायला लागले. “
ह्या मराठी कथा वाचा
एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो, अकबर बिरबल मराठी स्टोरी – Akbar Birbal Marathi Katha ह्या मराठी कथा पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…