
बेस्ट फ्रेंड कोट्स | Best Friend Quotes in marathi | मैत्री मराठी सुविचार
Best Friend Quotes in marathi | मैत्री मराठी सुविचार | बेस्ट फ्रेंड कोट्स , नमस्कार मित्रानो, जर तुम्ही बेस्ट फ्रेंड सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला बेस्ट फ्रेंड सुविचार वाचायला मिळतील.
Best Friend Quotes (1)
🌺🌷🌹
मोरासारखी नाचणारी ; निखळ आनंद देणारी
कोकीळेच्या स्वरात गाणारी ; सुखसंवाद करणारी
प्राजक्तासम नाजूक ; हळूवार सुगंधी पखरण
रातराणीसम गंधीत ; मस्त धुंद करणारी
प्रवाहासम वाहती ; हवी तिथे नेणारी
खडकाहूनी अचल ; खंबीर आधार देणारी
मेणाहूनी मऊ ; हवी तशी दबणारी
सोन्यासारखी झळाळणारी ; मैत्रीचा कस दाखवणारी
अन आरशासम पारदर्शी ; जणू तुमचीच प्रतिकृती
मैत्री अशी असावी
🌹🌷🌺🌺🌷🌹
Best Friend Quotes (2)
👏🙏👏
मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री……
🌾🍁🌾👏🏻
Best Friend Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
आज इथे उद्या तिथे…कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात, म्हणुन……..
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Best Friend Quotes (4)
🌸🌿🌸
या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,
कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही…..
🙏💐🙏
Best Friend Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
रोजच् आठवण यावी असे काही नाही,
रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि
तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात…….
✨🌺
friendship message in marathi (6)
🐾🌿🐾🌿
🎭 या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द
ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Best Friend Quotes (7)
🌹💐🌹
रंगलेल्या मैफिलीची, ती त-हा मज न्यारी होती,
मी दिलेली वेदना, माझ्याहुनीही प्यारी होती,
वाहव्वा!जल्लोश होता, शब्दशब्दा दाद होती,
न जाणे कोणत्या सुरेने, झिंगलेली सारी होती।
मी दिलेल्या आसवांचे, शब्दमोती होत होते,
बाजारी अन मैफिलीच्या, लिलाव त्यांचे होत होते,
शुष्क डोळ्यांनी उभी गर्दीतली मी एक होते,
गणगोत ते तुजभोवती, दुर्लक्षित मी होत होते।
होश घेऊनी जाण्या तुझा, वेदनेची साकी होती,
माहित नव्हते तुला, ती कहाणी बाकी होती,
रिक्क्त ओंजळीत माझ्या, आसवांची ओल होती,
कैफियत माझीच ती, माझ्यापरी एकाकी होती।
🌺🙏🙏🌺
Best Friend Quotes (8)
🙏🌹🌹🙏
रक्ताची नाती तर “रेडीमेड” मिळतात
आणि बाकीची म्हणे “कस्टमाइज़्ड” असतात
तरी “इट्स माइ चॉईस” हा असतो निव्वळ एक भास
सगळा आधीच असत “त्यानी” ठरवलेल खास
त्यातूनच मग जुळतात का काहींचे सूर अनॉखे
आणि त्यालाच म्हणायचे का आपण मैत्रीचे नाते?
🙏🌹🌹🙏
Best Friend Quotes (9)
🙏🌹🌹🙏
रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Best Friend Quotes (10)
🌹💐🌹
येणारे येतात अन जाणारे जातातही…
मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते …
करायची ठरवली तरी ती करता येत नाही
✍🏻✍🏻
Best Friend Quotes (11)
🌾🍁🌾
याला मैत्री म्हणतात……
काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत….
माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत
वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालणं नाही थांबत
अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत
बोलणं नाही झाल तरी आठवण नाही थांबत
गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत
नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी…..काही नाती नाही तुटत
एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल
🙏🌹🌹🙏
Best Friend Quotes (11)
🌾🍁🌾
शरीरात रक्त नसेल तरी चालेल
पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती
नेहमी वाटते नवीच
रक्ताच्या नात्यात नसेल
एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्रीच्या या नात्या बद्दल
लिहिण्यासारखे खूप आहे
खरेनात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी
त्यात खरा आनंद असतो!!!!
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (Best Friend Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓